मॉरिशसच्या पंतप्रधानपदी अनिरूद्ध जगन्नाथ

aniruddha
पोर्ट लुई – मॉरिशसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांत घसघशीत २/३ बहुमत मिळवून विजयी झाल्यामुळे या देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा पुन्हा एकदा अनिरूद्ध जगन्नाथ यांचेकडे सूपूर्द केली जात असल्याचे राष्ट्रपती कैलास प्रयास यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रपतींच्या कार्यालयातर्फे तसे निवेदन प्रसिद्ध केले गेले आहे.

या निवडणूकीत जगन्नाथ यांच्या पक्षाने एकूण ६२ पैकी ४७ जागांवर विजय मिळविला आहे. लेबर पार्टी व माजी विरोधीपक्ष मॉरिशियन मिलीटन्स मुव्हमेंट यांच्या युतीला केवळ १३ जागा मिळाल्या आहेत. जगन्नाथ यांनी यापूर्वी १९८२ ते ९५ व २००० ते २००३ या काळात पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडलेली आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे आश्वासन, राष्ट्रपतींच्या अधिकारात वाढ आणि संविधान सुधारणा या मुद्द्यावर त्यांच्या पक्षाने यंदाची निवडणूक लढविली होती.

पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे दिला असून राममुलाम यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. परिणामी राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढविण्यची त्यांची मनीषा अपुरीच राहिली आहे.

Leave a Comment