दुसऱ्या कसोटीसाठी स्टीव्हन स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

steve-smith
ब्रिस्बेन – मायकेल क्लार्कच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर क्रिकेटपटू स्टीव्हन स्मिथवर कर्णधारपदाची जबाबादारी सोपवण्यात आली आहे.

रविवारी रात्री ही घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली. स्टीव्हन स्मिथ मायकेल क्लार्कच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करेल असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले. स्मिथ हा ऑस्ट्रेलिया संघाचा ४५ वा कसोटी कर्णधार ठरला आहे.

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील स्मिथने पहिल्या डावात नाबाद १६२ आणि दुस-या डावात ५२ धावांची दमदार खेळी साकारली होती. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने ४८ धावांनी विजय मिळवला.

दुखापतीमुळे क्लार्क भारताविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. ब्रॅड हॅडिन हा ब्रिस्बेन कसोटी सामन्यात उपकर्णधारपदाची जबाबादारी पार पाडेल असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment