जळगांववर महिला राज

rupal
जळगांव – पाच लाख वस्तीच्या जळगांव शहरात प्रथमच सर्व महत्त्वाची पदे महिलांच्या ताब्यात आली असून येथे आता महिला राज आले आहे. या शहराची सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शहराचा विकास ठप्प झाला आहे आणि महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. कर्जाचा डोंगरही प्रचंड असून महापालिकेवर ५१३ कोटींचे कर्ज आहे. या सर्व परिस्थितीचा मुकाबला हे महिलामंडळ कसा करते हाच आता औत्सुक्याचा विषय बनला आहे.

जळगांवात महापौर राखी सोनवणे, जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, जिल्हा पंचायत अद्यक्ष प्रयाग कोळी, व जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील या प्रथमचपासून पदांवर होत्या. त्यात याच आठवड्यात महापालिकेच्या स्थायी समितीपदावर ज्योती चव्हाण या बिनविरोध निवडून आल्या आहेत. कलेक्टर रूबल अग्रवाल यांनी गेल्या वर्षभरात अनेक चांगले निर्णय घेतले असून कायद्याची अम्मलबजावणी त्या अतिशय कडकपणाने करत आहेत.

या शहरात वाळू तस्करी हे मोठेच आव्हान असून ते आव्हान या महिला कसे पेलणार याची चर्चा सध्या जोरावर आहे.

Leave a Comment