दुबई – आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतक ठोकणाऱ्या विराट कोहलीने टॉप २० मध्ये प्रवेश केला असून या क्रमवारीत तो १६व्या स्थानी विराजमान झाला आहे.
सलग शतकी खेळीमुळे विराट टॉप २० मध्ये
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराटने दोन डावात सलग शतकी खेळी केली, मात्र त्याची ही खेळी भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४८ धावांनी भारताला पराभूत केले. या कामगिरीमुळे विराटने रँकिंगमध्ये १६ व्या स्थानी झेप घेतली आहे. तर चेतेश्वर पुजारा १८व्या स्थानी आहे. ७०७ रेटिंगसह दक्षिण आफ्रिकेचा एफ. प्लेसिस १५ व्या स्थानी आहे तर न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅडन मॅकक्युलम ७२१ रेटिंगसह १४ व्या स्थानी आहे.
गोलंदाजीच्या क्रमवारीत इशांत शर्मा २१ व्या स्थानी घसरला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथने भारताविरुद्धच्या कसोटीतील दमदार प्रदर्शनाच्या जोरावर कारकिर्दितील सर्वोत्तम स्थान पटकावले आहे.