मुंबई : मुंबईतील मराठा मंदिर थिएटरच्या मागे असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या १५ मजल्यांच्या इमारतीत चौथ्या मजल्यावर आग लागली असून या आगीत 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.
मुंबईतील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या इमारतीला आग
आत्तापर्यंत ६० ते ६५ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून अग्निशमन दलाच्या १४ गाड्या व २ अँब्युलन्सही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही. तीन तासांपूर्वी लागलेली ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या इमारतीत पश्चिम रेल्वेचे कर्मचारी राहतात.