इडली चाट

idly
साहित्य – ३ ते ४ इडल्या (उरलेल्या असल्यास अधिक उत्तम, ताज्या नकोतच), पापडी १/२ वाटी, १ कांदा, चिंचेची गोड चटणी, दही, बारीक शेव, हिरव्या मिरच्या २, चाट मसाला ,लाल तिखट , जिरे पूड, कोथिंबिर आणि बारीक शेव, आवडत असल्यास पुदीना किंवा कोथिबीर चटणी

कृती- इडलीचे बारीक चौकोनी आकाराचे तुकडे करून घ्यावेत. तेल चांगले तापवून हे तुकडे सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावेत. पेपवरवर निथळावेत. गार झाल्यानंतर एका बशीत हे तुकडे, त्यावर पापडीचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, त्यावर दही, हिरवी चटणी घालावी. नंतर आवडीप्रमाणे चाट मसाला, लाल तिखटाची पूड, जिरे पावडर, चवीनुसार मीठ व वरून बारीक शेव घालून सजवावे. वरून चिंचेची गोड चटणी घालून कोथिबीर घालावी व लगेच खायला द्यावे.

Leave a Comment