पोलिस दलात ६१ हजार ४९४ पदांसाठी भरती

police
मुंबई – राज्यातील पोलिस दलात पुढील पाच वर्षात ६१ हजार ४९४ पदांसाठी नोकरभरती करण्यात येणार आहे. या पदांपैकी पहिल्या टप्प्यात पोलिस महासंचालक, मुंबई यांच्या आस्थापनेवर नवी ६४ पोलिस ठाणे व विविध घटकांसाठी १० हजार ८७९ पदे, बृहृन्मुंबई पोलिस आयुक्त यांच्या आस्थापनेवर १५०० पदे अशी एकूण १२ हजार ३७९ नवी पदे निर्माण करण्यात येणार आहेत.

यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून या पदांसाठी ५६४ कोटी ९९ लाख एवढा निधी मंजूर करण्यास उच्चस्तरीय सचिव समितीने व राज्य मंत्रिमंडळाने याआधीच मान्यता दिलेली आहे.