सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे बांधा – गडकरी

gadkari
मुंबई – केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाशी, नवी मुंबई इथे आयोजित पंधराव्या मालमत्ताविषयक प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात, अल्प किमतीत घरे बांधण्याचे आवाहन केले. बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन्स ऑफ इंडिया या संघटनांतर्फे वाशी येथे हे मालमत्ताविषयक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या देशात दहा लाखांहून अधिक किमतीची घरे विकत घेण्याची क्षमता अवघ्या दोन टक्के लोकांमध्येच आहे तर पाच ते दहा लाखादरम्यानची घरे विकत घेण्याची क्षमता केवळ पाच टक्के लोकांमध्ये आहे. अधिकाधिक लोकांनी घरं विकत घेण्यासाठी एकाच प्रकल्पात आयुष्यभराची कमाई करण्याची प्रवृत्ती बिल्डरांनी सोडून देऊन कमी किमतीत घरं विकली पाहिजेत, असा परखड सल्ला गडकरी यांनी बिल्डरांना दिला. कमी किमतीत घरं विकणार्या बिल्डरांना राज्यात पूर्ण सहकार्य मिळेल, अशी हमीदेखील गडकरी यांनी दिली. या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी नवी मुंबईचे माजी पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित होते.

Leave a Comment