पाच वर्षे पोलीस, हवालदारांची बदली नाही

police
नागपूर – पोलीस दलातील पोलीस हवालदार हा शेवटचा घटक आहे. त्यांची दर दोन वर्षांनी बदली करणे योग्य नसून या पुढे त्यांची पाच वर्षानी बदली केली जाईल. तर पोलीस दलात सुसूत्रता आणण्यासाठी पोलीस हवालदारांच्या बदल्यांचे अधिकार हे पोलीस अधिक्षकांना देण्यात येईल. या बदली प्रक्रियेत राज्य सरकार कुठलाच हस्तक्षेप करणार नाही. असे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील गुन्हेगारी टोळ्या मोडून काढण्यात येतील. गजानन पंढरीनाथ मारणे याची पुण्यात मोठी गुन्हेगारी टोळी आहे. या टोळीतील ९ गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तांनी तडीपारीचे आदेश काढले होते. त्यांना गेल्या सरकारने स्थगिती दिली होती. त्यामुळे गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळाल्याने त्यांचे धैर्य वाढले होते. हे पुढील काळात चालू देणार नाही, असा इशारा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.

पोलीस दल सक्षम व एकसंघ आहे. तो अधिक सक्षम करण्याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, यापुढे राजकीय हस्तक्षेप असणार नाही, याची मी ग्वाही देतो. गुन्हेगारांनी कितीही राजकीय दबाव आणला तरी त्याला संरक्षण देणार नाही. बीओटी तत्त्वावर जादा चटई क्षेत्र देऊन पोलिसांना मोफत घरे देणार, अशी घोषणाही त्यांनी केली. राज्यातील पोलीस दलापुढे जरूर आव्हाने आहेत. एखाद्या आरोपीवर ज्या अधिकार्याने गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावरच पुराव्यासह आरोपीला शिक्षा होईपर्यंत पुढील काळात जबाबदारी राहील, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मोठय़ा गुन्ह्याप्रमाणे छोटे गुन्हेही दाखल करून घेतले पाहिजे, असे आदेशही काढले आहेत. यापुढे प्रत्येक जिल्ह्यात विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात येईल.

Leave a Comment