नगरच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

supreme-court
नवी दिल्लीः अहमदनगरवासियांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी सोडण्यावरुन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याविरोधातली याचिका फेटाळून लावल्यामुळे मराठवाडावासियांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मराठवाड्याला पाणी पोहचलेच पाहिजे यावर शिक्कामोर्तब केले आहे.

जायकवाडी धरणात मुळा आणि भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे आमच्या वाट्याचे पाणी मराठवाड्याला का दिले जात असल्याच्या विरोधात नगर जिल्ह्यातील शेतकरी आणि नेते रस्त्यावर उतरले होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या हरिश्चंद्र फेडरेशनने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास स्थगिती द्यावी अशी अपील सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. तसेच यासंबंधीचा निर्णय उच्च न्यायालयाने घ्यावा असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला होता. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठवाड्यातल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. जायकवाडीला पाणी मिळावे की नाही, यासंदर्भात आतापर्यंत १७ याचिका दाखल झाल्या आहेत.

Leave a Comment