राज्य सरकारने दिला दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा

dahihandi
नागपूर : क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दहीहंडीला आता राज्य सरकारने साहसी खेळाचा दर्जा दिल्याबाबतची घोषणा केली.
राज्य सरकारने दहीहंडीला साहसी प्रकाराच्या खेळाचा दर्जा देऊन या खेळात आलेल्या सर्व अडथळ्यांना दूर केल्यामुळे दहीहंडी आयोजकांमध्ये एकच जल्लोषांचे वातावरण आहे.

दहीहंडीला होणाऱ्या अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी बालगोविंदांना बंदी घालण्यात आली होती. तसेच अधिक थरांवर बंदी घालण्यात आली होती त्यावरुनही मोठा वादही झाला होता.

सर्वोच्च न्यायालयात काही दिवसांपूर्वी बालहक्क समितीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा खेळ खेळताना अनेक मार्गदर्शक तत्व घालून दिल्यामुळे दहीहंडी खेळातील रोमांच संपुष्टात येणार असल्याची प्रतिक्रिया आयोजकांनी आणि पथकांनी दिली होती. पण गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे नियम महत्त्वाचे असल्याचे मत बाल हक्क समितीने नोंदवले होते.

Leave a Comment