मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे

highcourt
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला वारीनंतर पंढरपुरात होणार्यात घाणीबाबत फटकारले असून सरकारच्या निष्क्रीयतेमुळेच पंढरपूर बकाल झाले, असे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले आहेत.

उच्च न्यायालयाने आज आपले मत पंढरपूरमध्ये निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेचा शोध घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या अहवालावर नोंदवले. पंढरपुरात कायमस्वरूपी शौचालय बांधण्यात पुढाकार घेतला असता तर वारीनंतर तिथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले नसते. पंढरपूर बस स्थानक, पंढरपूर परिसर आणि पंढरपूरातले अनेक मठ हे राज्य सरकारच्या अधिकारात येतात. याठिकाणी स्वच्छता गृह बांधण्यासाठी सरकारने काहीच हालचाल केली नाही, असाही ठपका न्यायालयाने ठेवला आहे. मुंबई उच्च न्यायालय पंढरपूर स्वच्छता याचिकेवर सोमवारी अंतिम निकाल देणार आहे.

Leave a Comment