पाश्चात्य मुस्लीम ऑनलाईन मॅट्रीमोनी साईटच्या प्रेमात

muslim
मुस्लीम समाजात आजही लग्न ठरविताना कुटुंबियांनी ठरविण्याची पद्धत रूढ असली तरी पाश्चात्य व त्यातही अमेरिका व युरोपमधील मुस्लीम तरूण तरूणी विवाहासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मला अधिक पसंती देऊ लागल्याचे दिसून येत आहे. गेल्या दशकापासून ऑनलाईन मॅट्रीमोनीची सुरवात झाली असली तरी आता या साईटचा वापर प्रचंड प्रमाणात सुरू झाला असल्याचे सांगितले जात आहे. ऑनलाईन मॅचमेकींग ही काळाची गरज आहे व त्याला मुस्लीम समाजही अपवाद असू शकत नाही असे या तरूणांचे म्हणणे आहे.

सिंगल मुस्लीम डॉट कॉम, मुस्लीम मॅट्रीमोनी, हिपस्टर शादी डॉटकॉम अशा अनेक साईट आज उपलब्ध आहेत. मात्र अजूनही मुस्लीम तरूण तरूणींना लग्न हा मुस्लीम समाजाचा पाया आहे, तसेच ती मोठी जबाबदारी आहे हे मान्य आहे. त्यामुळे या साईट उपयुक्त असल्या तरी त्यांत कांही कमतरता आहेत असेही त्यांना वाटते. अर्थात सिंगल मुस्लीम डॉटकॉम साईटवर १० लाख सभासद आहेत हेही खरेच. या साईटवरून दररोज किमान चार विवाह जुळतात असे या साईटचालकांचा दावा आहे.

मुस्लीम समाजातही वेगळे पंथ, भाषा आहेत. मुस्लीम समाज आजही सर्रास पब किंवा क्लबमध्ये जात नाहीत. परिणामी विवाहासाठी योग्य जोडीदार समजण्यावर मर्यादा येतात.त्यामुळे या मॅट्रीमोनी साईट महत्त्वाच्या ठरतात असेही मत व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment