पवार, तटकरेंच्या चौकशीची मागणी मान्य

ajit-pawar
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशीला हिरवा कंदिल दाखवला असून आता या दोघांची चौकशीला सुरुवात होणार आहे. अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे आगामी काळात अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पवार आणि तटकरेंच्या चौकशीची परवानगी मागणाऱ्या फाईल्स अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर पडून होत्या. पण त्या सर्व फाईल्स मुख्यमत्र्यांनी क्लिअर केल्याने लवकरच दोघांची चौकशी होणार आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याही चौकशीला परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यासह विविध घोटाळ्यांप्रकरणी लाचलुचपत विभाग भुजबळांची चौकशी करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment