पडझडीनंतर सेन्सेक्स, निफ्टीमध्ये सुधार

share-market
मुंबई – गुरुवारी २०० पेक्षा जास्त अंकांची घसरण नोंदवल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने शुक्रवारी सकाळाच्या सत्रात सेन्सेक्स ६४ अंकांनी सुधारला होता.

२७,७६६ अंकांवर सेन्सेक्स असून, आयटी, भांडवली वस्तू, धातू आणि बांधकाम क्षेत्राच्या शेअर्सच्या मुल्यामध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४ अंकांनी वधारला असून, निफ्टी ८३०० अंकांच्या पुढे आहे.

कच्च्या तेलांच्या किंमती पाच वर्षांच्या नीचांकी पातळीला पोहोचल्याने तेल आणि वायू कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे. तेलाच्या किंमती कमी
झाल्याने तेल कंपन्यांनी सुरु केलेल्या तेल खरेदीमुळे डॉलरला मागणी वाढून रुपयाचे अवमूल्यन होत आहे.

Leave a Comment