ज्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले त्यांच्याशी संबंध तोडले

raj-thackarey
मुंबई – राज ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ज्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत अशा सर्वांशी आपण संबंध तोडले आहेत आणि कार्यकर्त्यांनी तोडावेत, असा फतवाच काढला आहे.

राज ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेची दाणादाण उडाल्यानंतर स्वतःसह सगळेच बदलायचे ठरवले असून आपण आता लोकांचे ऐकून घेत असून जमिनीवर आलो आहोत, अशी कबुली मध्यंतरी त्यांनी स्वतःच दिली होती. त्यातून ते नरमल्याचे स्पष्ट जाणवले आहे आणि सोबतच, पक्षाची नव्याने बांधणी करण्याचे कामही त्यांनी जोमाने सुरू केले आहे. मनसेमध्ये मोठे फेरबदल करण्याचे संकेतसुद्धा त्यांनी दिले होते आणि त्यादृष्टीने हालचालींना वेग आला असून आता राज ठाकरे काय पाऊल उचलतात, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. माजी आमदार प्रवीण दरेकर, वसंत गीते यांचे राजीनामे राज स्वीकारणार का? या बाबींकडे मनसे कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे देणार्यां या सैनिकांना ते समजावतील आणि सोबत घेतील, असे अनेकांना वाटत होते. परंतु, राज यांनी दरेकर, गीते, चांडक आदींबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Leave a Comment