जगभरातल्या समुद्रकिना-यावर तब्बल ५ लाख टन मायक्रोप्लास्टिक

plastic
नवी दिल्ली – एका सर्वेक्षणानुसार जगभरात महासागराच्या पृष्ठभागावर तब्बल पाच लाख टन प्लास्टिकचे तुकडे तरंगत असल्याचे समोर आले आहे.

२००७ ते २०१३ या दरम्यान सहा देशांच्या लगत असणा-या समुद्रांमधून हे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यासाठी २४ समुद्रसफरी आखण्यात आल्या. प्रत्यक्ष पाहणी करून, प्लास्टिकचे मोठे तरंगते तुकडे गोळा करून आणि जाळ्या वापरून मायक्रोप्लास्टिक एकत्र करून ही माहिती मिळवण्यात आली आहे. किनार्या जवळच्या समुद्रात प्लास्टिकचे मोठे तुकडे आढळले. त्यांचे विघटन होऊन मायक्रोप्लास्टिक तयार झाले आहे. ध्रुवीय प्रदेशाजवळसुद्धा मायक्रोप्लास्टिकचे अस्तित्व आढळून आले आहे. समुद्रात तयार होणारे भोवरे मायक्रोप्लास्टिकचे विघटन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असा निष्कर्ष निघाला आहे. समुद्रामध्ये आढळणारे प्लास्टिक कचर्यााचे तरंगते ढिग हे या कचर्याधचे अंतिम विश्रांतीस्थान नाही. तर हा कचरा समुद्राच्या वेगवान वर्तुळाकृती प्रवाहांमुळे मायक्रोप्लास्टिकमध्ये रूपांतरित होत असल्याचे आढळल्यामुळे संपूर्ण सागरी पर्यावरण यामुळे धोक्यात आले आहे.

Leave a Comment