गोपीनाथगड स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

gopinath
परळी – माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात त्यांचे स्मारक उभारले जात असून त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी ३ वा. होत आहे.

पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातच गोपीनाथ मुंडे यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले होते. त्याच जागी गोपीनाथगड हे स्मारक उभारले जाणार आहे. या कार्यक्रमाला भगवानगडचे मठाधिपती नामदेव शास्त्रीमहाराज, राष्ट्रसंत भय्यूमहाराज उपस्थित राहणार आहेत. दसर्‍याच्या दिवशी भगवानगडावर तर १२ डिसेंबरला मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर मुंडेंचे समर्थक मेळावा भरविणार आहेत.

या भूमिपूजनासाठी राज्याच्या विविध भागातून मुंडे यांचे समर्थक येणार आहेत. या जागेवर पोलिस बंदोबस्त चोख ठेवला गेला असून या जागेची काल राज्याच्या ग्रामीणविकास मंत्री व मुंडे यांच्या कन्या पंकजा यांनीही पाहणी केली असल्याचे समजते.

Leave a Comment