खडसेंनी झटकली जबाबदारी

eknath-khadse
नागपूर – महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा कर्ज माफ करा किंवा वीज बिल माफ करा, शेतक-यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. आधीच्या सरकारने या उपाययोजना करून पाहिल्या आहेत. त्यानंतर आत्महत्या थांबल्या का, असा अजब सवाल उपस्थित करून सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसलेल्या शेतक-यांच्या जखमेवरच मीठ चोळण्याचे काम केले आहे. विधान परिषदेत २६०नुसार झालेल्या दुष्काळावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. प्रत्यक्षात शेतक-यांच्या पदरात काहीच पडले नाही. जुन्याच योजना आणि टंचाईग्रस्तांसाठी असलेली सूट देऊन शेतक-यांची बोळवण करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आतापर्यंत अनेक उपाय योजले गेले. पण आत्महत्या काही थांबल्या नाहीत, असे खडसे म्हणाले. आत्महत्या का होत आहेत याचे कारण सरकार शोधेल, असेही ते म्हणाले. मात्र आत्महत्या रोखणे हे एकटय़ा सरकारचे काम नसल्याचा अजब तर्क त्यांनी लावला. यासाठी ‘एनजीओ’ आणि सर्वसामान्यांनीही पुढे यायला हवे, असे सांगत त्यांनी आपली जबाबदारी झटकली.

Leave a Comment