कोलंबो – श्रीलंकेत हवाई दलाच्या एएन ३२ या विमानाचा उड्डाणानंतर सकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान होकांदरा येथे कोसळले, या अपघातात दोन जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती हवाई दलाचे प्रवक्ते गिहान सेनेविरात्ने यांनी दिली.
श्रीलंकेचे लष्करी विमान दुर्घटनाग्रस्त
रातमलाना तळावरुन हे विमान कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील कटुनायके येथील हवाई तळाच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.