अवकाळी पावसाचा सवाई गंधर्व महोत्सवाला फटका

savai-gandhrav
पुणेः अवकाळी झालेल्या पावसामुळे शहराची मोठी सांस्कृतिक पर्वणी असणारा सवाई गंधर्व महोत्सव तुर्त स्थगित करण्यात आला आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये हा महोत्सव घेण्यात येईल, असे आयोजकांनी जाहीर केले आहे.

गुरुवारपासून पुण्यातल्या रमणबाग प्रशालेच्या मैदानावर सवाई गंधर्व महोत्सवाला सुरुवात झाली. पण शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे कार्यक्रमस्थळी प्रचंड पाणी साचल्यामुळे अचानक स्थगिती देण्यात आली. नियोजित कार्यक्रमानुसार रविवारपर्यंत विविध कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करणार होते. त्याचबरोबर इतरही व्यवस्था अडचणीत आल्याने हा महोत्सव तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अवकाळी पावसामुळे शुक्रवारचे सत्र सुरुवातीला पाच वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. पण त्यानंतरही व्यवस्था अशक्य असल्याचे लक्षात येताच महोत्सव स्थगित करण्यात आला आहे.

Leave a Comment