‘सदगुरु वामनराव पै जीवनगौरव’ पुरस्कार डॉ. माशेलकरांना जाहीर

ragunath
मुंबई : सदगुरु वामनराव पै जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांना जाहीर झाला असून माशेलकर यांना हा पुरस्कार जीवनविद्या मिशन या सेवाभावी संस्थेतर्फे देण्यात येणार आहे. वामनराव पै यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षीपासून या पुरस्कार पुरस्काराला सुरुवात होत आहे. पद्मभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर हे या पुरस्काराचे पहिलेच मानकरी ठरले आहे.

डॉ.रघुनाथ माशेलकर यांचा गौरव विज्ञान क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल केला जाणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकीक वाढवण्याचे कार्य डॉ.माशेलकरांनी केले आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अर्थात एन.सी.एल.संचालक, कौन्सिल ऑफ सायंटिफीक अँड इडंस्ट्रियल रिसर्च म्हणजेच सी.एस.आय.आर.चे महासंचालक अशी अनेक महत्वाची पदे माशेलकरांनी भूषवली आहेत.

येत्या १४ डिसेंबर रोजी गोव्यात आयोजित जीवनविद्या मिशनच्या व्याख्यानमालेत डॉ.माशेलकरांना सदगुरु वामनराव पै जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाईल.

Leave a Comment