माजी खासदार अण्णा जोशी यांचे निधन

anna
पुणे – भाजपचे माजी खासदार लक्ष्मण सोनोपंत उर्फ अण्णा जोशी यांचे दीर्घ आजाराने खासगी रूग्णालयात बुधवारी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि १ मुलगी असा परिवार आहे.

पुण्यातून अण्णा जोशी यांनी भाजपतर्फे लोकसभा निवडणूक लढविली होती आणि ते १९९१ ते ९६ या काळात पुण्याचे खासदार होते. त्यापूर्वी ते आमदार म्हणूनही निवडून आले होते. त्यांनी विधानसभा उपसभापतीपदाची जबाबदारीही सांभाळली होती. १९९९ मध्ये भाजपने त्यांना तिकीट न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यानी याच पक्षाच्या तिकीटावर कोथरूड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविली मात्र ते पराभूत झाले होते.

इंदिरा गांधींनी १९७५ साली लागू केलेल्या आणीबाणीविरेाधात अण्णांनी चांगलाच आवाज उठविला होता. परिणामी त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गेले कांही दिवस त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.

Leave a Comment