महाराष्ट्रातही उबेरवर बंदी

uber
मुंबई – महाराष्ट्र शासनाने उबेर आणि ओल्ड कॅब सर्व्हिसवर केंद्राकडून आलेल्या आदेशानुसार बंदी घातली असल्याचे वृत्त आहे. या संबंधीची घोषणा राज्य वाहतूक परिवहन मंत्री दिवाकर रावते आज विधानसभेत करणार आहेत.

दिल्लीत उबेर टॅक्सीमध्ये एका २३ वर्षीय युवतीवर टॅक्सीचालकाने शुक्रवारी बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर देशभरात या टॅकसीसेवेवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि तसे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. दिल्ली, हैद्राबाद मध्ये या टॅक्सीसेवेवर बंदी लागू झाली आहे आणि आता महाराष्ट्रातही ही बंदी लागू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सर्व राज्यांनी वेबआधारित टॅकसी सर्व्हीसवर बंदी घालावी असे आदेश यापूर्वीच दिले आहेत.

Leave a Comment