गुगल क्रोमकास्ट भारतात उपलब्ध

crome
गुगलने त्यांचे क्रोमकास्ट उपकरण भारतात उपलब्ध करून दिले असून त्याची किंमत आहे २९९९ रूपये. यासाठी गुगलने स्नॅपडीलशी करार केला असून ते स्नॅपडीलमार्फत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या डिव्हाईसच्या लॉचिंगसाठी गुगलने एअरटेल बरोबर करार केला आहे. त्यानुसार एअरटेल ६० जीबी ब्रॉडबँड डेटा ( ३ महिन्यांसाठी म्हणजे प्रत्येक महिन्याला २० जीबी) नवीन क्रोमकास्ट युजरला देणार आहे.

हे डिव्हाईस वापरण्यासाठी इंटरनेटचा स्पीड समाधानकारक असायला हवा असे सांगितले जात आहे. या उपकरणाच्या मदतीने नेटफ्किक्स, यूट्यूब, व बाकी इंटरनेट रिलेटेड सेवा टिव्हीवरही युजर वापरू शकणार आहे. हे उपकरण स्मार्ट टिव्हीला जोडता येते तसेच स्मार्टफोन, लॅपटॉपलाही कनेक्ट करता येते. स्मार्टफोनचे कंटेंट टिव्हीपर्यंत नेणेही या उपकरणामुळे शक्य असले तरी कॉपीराईटमुळे लोकल कंटेंट मात्र टिव्हीवर दिसू शकणार नाहीत असेही समजते.

इरोज कंपनीनेही ही सेवा देऊ केली असून ही कंपनी क्रोमकास्टच्या नवीन युजरला दोन महिने ही सेवा मोफत देणार आहे.

Leave a Comment