राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या मुलांचा प्रताप

yerwada
पुणे – खुनाच्या गुन्हृयातल्या आरोपींना न्यायाधीशांचा बनावट कोर्ट ऑर्डर तयार करून जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला असून पुण्यातील येरवडा जेलमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवकाच्या मुलांनी हा प्रताप केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांची दोन मुले तुषार निम्हण आणि चेतन निम्हण अशी या ठकसेन भावांची नावे आहेत. गेल्या वर्षी १२ एप्रिलला प्रतिक निम्हण हत्येप्रकरणी या दोन भावांसहित १० जणांना अटक झाली होती. हत्येचा आरोप असल्यामुळे ते गेल्या दीड वर्षांपासून कारागृहात शिक्षा भोगत होते. यातील ८ जणांना जामीन मिळाला होता. मात्र तुषार आणि चेतनचा जामीन सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने फेटाळला होता.

या दोघांनी गेल्या महिन्यात जामीन मिळाल्याचा २० तारखेचा कोर्टाचा आदेश दाखवून २२ तारखेला आपली मुक्तता करून घेतली होती. त्यानंतर फिर्याददार कीर्ती काळे यांनी माहिती काढल्यावर कोर्ट ऑर्डर बनावट असल्याचे समोर आले आणि पोलिसांनी या दोन्ही निम्हण बंधूंना अटक केली आहे. विशेष म्हणजे जिल्हा न्यायाधीशांच्या सही – शिक्क्याचा बनावट आदेश येरवडा कारागृहात सादर करण्यात आला होता. त्यामुळे येरवडा कारागृहातील यंत्रणेवर प्रश्न्चिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Comment