मुंबई – मुंबई शेअर बाजाराच्या गुरुवारी सकाळच्या सत्रात बाजार उघडताच व्यवहाराला निराशाजनक सुरुवात झाली आहे.
बुधवारी दिवसअखेर सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर बीएसई सेन्सेक्स ३४ अकांनी वधारला होता. मात्र गुरुवारी सकाळी व्यवहाराला सुरुवात होताच निर्देशांकामध्ये मोठी घसरण झाली. बीएसई सेन्सेक्समध्ये २५८ पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली असून, सध्या बीएसई सेन्सेक्स २७,५७२ अंकांवर आहे.
पुन्हा एकदा सेन्सेक्स, निफ्टीने खाल्ली गटांगळी
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ७४ अंकांची घसरण झाली असून, निफ्टी सध्या ८३०० पेक्षा खाली आहे. देशी आणि परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्यामुळे ही घसरण सुरु आहे.
बुधवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २७,८३१.१० वर बंद झाला होता तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही १४.९५ अंकांची वाढ होऊन तो ८,३५५.६५ वर बंद झाला होता.