अॅडलेड – टीम इंडियाने ओव्हल स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटीच्या तिसर्या दिवशी ५ विकेट गमावत ३६९ धावा केल्या आहेत. मैदानावर रोहित शर्मा आणि रिध्दीमान सहा खेळत आहे.
कोहलीचे ‘विराट’ शतक
मिशेल मार्शच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने शानदार खेळी करुन फॉलोऑनचे संकट टाळले. त्याचे कारकीर्दीतील सातवे आणि कर्णधार म्हणून पहिले शतक आहे. कोहलीने डाव सावरला होता. तिसर्याी दिवसाचा सामना संपायला केवळ तीन ओव्हर शिल्लक असताना मिशेल जॉन्सनने त्याला बाद केले. कोहली ११५ धावांवर बाद झाला.
अॅडलेड येथे शतक झळकावून विराट कोहलीने एक विक्रम प्रस्थापित केला असून कर्णधार म्हणून खेळत असताना पहिल्याच कसोटीत शतक झळकवणारा तो चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी विजय हजारे, दिलीप वेंगसरकर आणि सुनील गावसकर यांनी ही कमाल करुन दाखविली आहे.
विराटला साथ देत असलेल्या चेतेश्वरने संयमीत फलंदाजीचे प्रदर्शन करत अर्धशतक पूर्ण केले, मात्र त्याला शतक पूर्ण करता आले नाही. नाथन लियॉनने त्याचा त्रिफळा उडविला. पुजाराने ९ चौकारांच्या मदतीने ७३ धावा केल्या.