मुंबई : मुंबई पोलिसांनी मुंबईतील प्रसिद्ध भवन्स महाविद्यालयात सुरु असलेल्या फेस्टिव्हलमध्ये मेथ आणि एम.डी. नामक अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका इसमाला अटक केली. पोलिसांनी ही कारवाई एका समाजिक संघटनेच्या मदतीने केली आहे. सुनिल शर्मा असे या आरोपीचे नाव आहे.
त्याच्याकडून पोलिसांनी मेथ आणि एम.डी. या अंमली पदार्थांच्या १८ ग्रॅमच्या पुड्या जप्त केल्या असून याची किंमत ३० ते ४० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
कॉलेजमध्ये अमली पदार्थ विक्रीप्रकरणी एकाला अटक
भवन्स महाविद्यालयात सुरु असलेल्या कार्यक्रमात एक इसम अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी येत असल्याची माहिती जनआंदोलन या सामाजिक संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार या पदाधिकाऱ्यानी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला अटक केली. याप्रकरणी सुनिल शर्मा याच्याविरोधात डी.एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.