सत्यार्थी आणि मलालाला आज नोबेल प्रदान

combo
स्टॉकहोम – भारतातील आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझई यांना आज यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

गेल्या महिन्यात सत्यार्थी आणि मलाला यांच्यासह अन्य ११ जणांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम आणि नॉर्वेच्या ओस्लो येथे आज पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सत्यार्थी आणि मलालाला नोबेल पदक, नोबेल डिप्लोमास आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, रोख पुरस्कार म्हणून १.१० दशलक्ष डॉलर्सही देण्यात येणार आहेत.

हा पुरस्कार माझा नाही. भारतातील लहान मुलांचा आहे. त्यामुळे पुरस्काराची रक्कम मी त्यांच्यासाठीच खर्च करणार आहे, असे सत्यार्थी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. बालकांच्या अधिकाराचा मुद्दा प्राधान्याने हाती घेतल्याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभारही मानले आहे.

Leave a Comment