विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदासाठी आरआर आबांचे नांव

patil
मुंबई- हिवाळी अधिवेशनातच विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा ठोकला असून नेतेपदासाठी माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे नांव सुचविले गेले आहे. तसे पत्रही राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सादर केले असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले.

पवार म्हणाले की काँग्रेसपेक्षा आमचे संख्याबळ अधिक आहे त्यामुळे विरोधीपक्षनेतेपदावर आमचाच हक्क आहे.यामुळे आम्ही हा हक्क सांगितला असून त्यावर अंतिम निर्णय अध्यक्ष घेतील. आबांचे नाव देताना त्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या गेल्या आहेत. सर्व नियम आणि कायदे पडताळून अध्यक्ष निर्णय देतील मात्र त्यांनी कॉग्रेसपेक्षा आमचे संख्याबळ जास्त आहे याला प्राथमिक मान्यता दिली आहे.

विधानपरिषदेतही राष्ट्रवादीचे संख्याबळ काँग्रेसपेक्षा अधिक असल्याने तेथेही आम्ही धनंजय मुंडे यांचे नांव विरोधीपक्ष नेतेपदासाठी दिले असून तसे पत्र विधानपरिषदेच्या सभापतींना दिले असल्याचेही पवार यांनी सांगितले.

Leave a Comment