भारतात दाखल झाला गूगलचा ‘नेक्सस ६’!

nexus
नवी दिल्ली : जाईंट सर्च इंजिन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गूगलने आपला बहुचर्चित स्मार्टफोन नेक्सस-६ भारताच्या बाजारात आणला असून हा स्मार्टफोन आजपासून (बुधवार) उपलब्ध होणार आहे.

कंपनीने आपल्या वार्षिक ग्रेट ऑनलाईन शॉपिंग फेस्टिव्हल (जीओएसएफ) दरम्यान या स्मार्टफोनला विशेष रुपात लॉन्च केले. हे आयोजन १०-१२ डिसेंबरपर्यंत होणार आहे.

याबाबत गूगल इंडियाचे कार्यकारी संचालक राजन आनंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जीओएसएफ’चे पहिले वर्जन २०१२ मध्ये लॉन्च करण्यात आले होते. यामध्ये ९० मर्चंट सहभागी झाले होते. तर यावर्षी हीच संख्या ४५० पर्यंत पोहचली. भारतात लोकांचा ऑनलाईन शॉपिंगवर विश्वास वाढायला लागला आहे.

गूगलच्या म्हणण्यानुसार देशभरात ऑनलाईन खरेदी वाढविण्याच्या हेतून ‘जीओएसएफ’ची सुरुवात करण्यात आली आहे.

फ्लिपकार्टवर नेक्सस-६ची विक्री होणार आहे. या स्मार्टफोनची किंमत आहे ४३,९९९ रुपये (३२ जीबी) तसेच ४८,९९९ रुपये (६४ जीबी)… क्रोमकास्टसाठी कंपनीने भारती एअरटेल आणि स्नॅपडीलशी हातमिळवणी केली आहे.