नो ‘आधार’ फॉर ‘पीएफ’

aadhar
मुंबई : सरकारकडून भविष्य निर्वाह निधी (पीएफ)साठी ‘आधार कार्ड’ची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून याबाबत लोकसभेत श्रममंत्री बंडारु दत्तात्रय यांनी माहिती दिली. ते म्हणाले, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कर्मचा-यांना पीएफसाठी अशा प्रकारचे कोणतेच बंधन घातलेले नाही. निवासी भारतीयांना ‘आधार कार्ड’ इश्यू केले जात आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) कडून नोंदणीसाठी मल्टि-रजिस्ट्रेटर मॉडेल राबवले जात असल्याचे दत्तात्रय यांनी सांगितले. यामध्ये बँकांसह अनेक बिगर सरकारी संस्थांची नोंदणीसाठी रजिस्ट्रार म्हणून नेमणूक केली आहे. सरकारच्या या धोरणामुळे ‘आधार कार्ड’ नसलेल्या लोकांसाठी ‘पीएफ’चा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Comment