कंत्राटदाराने घडवली मुनगंटीवारांची तिरुपतीची कौटुंबिक सहल!

sudhir
नागपूर : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खासगी विमानाने मुंबई ते नागपूर, नागपूर ते तिरुपती, तिरुपती ते नागपूर आणि पुन्हा नागपूर ते मुंबई, केलेली ही कौटुंबिक सहल वादाचा भोवऱ्यात सापडली असून विशेष म्हणजे एका बांधकाम कंत्राटदाराच्या कृपाशीर्वादाने ही सहल झाल्याची चर्चा सुरु आहे.

पण या गोष्टीचा सुधीर मुनगंटीवार यांनी इन्कार केला. तिरुपती देवस्थानाच्या विश्वस्तपदी आपली नेमणूक करण्याचा प्रस्ताव आल्याने त्या भेटीवर आपण गेलो होतो आणि सर्व खर्च पक्षाने केल्याचे स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिले आहे.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाचा कानमंत्र सुधीर मुनगंटीवार हे विसरले का असा प्रश्न आता विचारला जात आहे. तसेच मुनगंटीवार यांच्या तिरुपतीवारीसाठी भाजप १५ लाखांचा खर्च का करेल असा सवालही उपस्थित होत आहे.

Leave a Comment