नखापेक्षा छोट्या चीपमध्ये नॅनो बायबल - Majha Paper

नखापेक्षा छोट्या चीपमध्ये नॅनो बायबल

bible
जेरूसलेम नॅनो बायबल कंपनीने नॅनो टेक्नॉलॉजीच्या इतिहासात नवीन भर घातली असून त्यांनी संपूर्ण न्यू टेस्टामेंट नखापेक्षा बारीक आकाराच्या चीपमध्ये अंतर्भूत करण्यात यश मिळविले आहे. सिलीकॉन चीपमध्ये हे बायबल आहे आणि त्याचा आकार आहे ०.२ इंचापेक्षाही कमी. जगातले हे सर्वात छोटे बायबल असल्याचा कंपनीचा दावा असून त्यांनी या कामगिरीची नोंद गिनीज बुक मध्ये करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

सिलीकॉन वेफरपासून बनविलेल्या या चीपमध्ये हे बायबल मूळ ग्रीक भाषेतील बायबल आहेच पण विशेष म्हणजे ही चीप कुठेही फिट करता येणार आहे. उदाहरणार्थ घड्याळात किंवा दागिन्यातही ही चीप बसविता येणार आहे. यातील अक्षरांची रूंदी ०.१८ मायक्रॉन इतकी सूक्ष्म असल्याने ही अक्षरे नुसत्या डोळ्यांनी वाचता येणार नाहीत तर त्यासाठी पॉवरफुल मायक्रोस्कोपच वापरावा लागणार आहे.

Leave a Comment