धर्मनगरी वाराणसी बनतेय तंत्रज्ञान नगरी

varanasi
वाराणसी – हिंदू धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून जगभरात ओळख असलेले वाराणसी शहर आता कार्पोरेट जगताची मक्का म्हणून ओळखली जाऊ शकेल असे संकेत मिळू लागले आहेत. पंतप्रधान मोदींनी येथून निवडणूक लढविली होती आणि तेव्हाच या क्षेत्राला तंत्रज्ञान शहर म्हणून ओळख मिळवून देण्याचा संकल्प सोडला होता. त्यांचा हा संकल्प आता पूर्ण होत असल्याचे दिसून येत आहे.

रिलायन्स ने आपली फोरर जी सेवा या शहरापासूनच सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असून ही सेवा देशात प्रथम या शहरात सुरू होणार आहे. मार्च एप्रिलमध्ये रिलायन्स या सेवेचा प्रारंभ वाराणसीपासून करणार आहे. खासगी क्षेत्रातील नामवंत बँक एचडीएफसीनेही या महिन्यातच वाराणसीत डिजिटल बॅकींग सुरु कूण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यासंबंधीचा कार्यक्रम या महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात होणार आहे. आजपर्यंत असे कार्यक्रम देशाची आर्थिक राजधानी मुंबईत केले जात असत. या कार्यक्रमात एचडीएफसी ७० ते ८० डिजिटल बँकींग अॅप लोँच करणार आहे.

Leave a Comment