जगभरातील निवडक ८५ देशांत लँडलाईन तसेच सेल फोनवरून मोफत कॉल सुविधा देणारे अॅप नुकतेच लाँच करण्यात आले असून त्याचे नांव कॉल प्लस असल्याची माहिती टेकसाईट सीनेटमधून दिली गेली आहे.
इंटरनॅशनल कॉल फ्री सुविधा देणारे कॉल प्लस अॅप
या अॅपमुळे युजर ८५ देशात मोफत कॉल करू शकणार आहे. विशेष म्हणजे हे अॅप कॉल करणार्या युजरसाठी आवश्यक असले तरी कॉल रिसिव्ह करणार्यांकडेही हे अॅप असणे गरजेचे नाही. अॅपची ही सुविधा सध्या अमेरिका, मेक्सिको, चीन आणि ब्राझील रिजनमध्ये सुरू करण्यात आली आहे. नंतर ती लवकरच अन्य देशातही सुरू होणार आहे. यासाठी दररोज युजरला १ डॉलरपेक्षाही कमी खर्च येणार आहे. युजरने दररोज ६१ रूपयांचे चार्जिंग केले तर त्याला त्या दिवसांत ८५ देशांपैकी कुठेही अनलिमिटेड कॉल करता येणार आहेत.
भारतात हे अॅप उपलब्ध करून देण्यात आलेले नसले तरी लवकरच ही सुविधा भारतासाठीही येईल असे सांगितले जात आहे. सध्या भारतात फोन व व्हिडीओ कॉलिंगची मोफत सुविधा देणारी टँगो टेक्स्ट, स्काइप, वूव्हू व्हिडीओ कॉल, फ्रींग फ्री कॉल्स आणि सीन अॅप ही अॅपच आहेत.