हाफिज सईदचे ‘ट्विटर’कडून अकाऊंट सस्पेंड

saeed
लाहोर : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय ट्विटरकडून घेतला आहे. तसेच जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेच्या अकाऊंटवरही कारवाई करण्यात आली आहे.

हाफिज सईदने पाकिस्तानला ग्लोबल इस्लामिक राष्ट्र बनविण्याची घोषणा गेल्या शुक्रवारी पाकिस्तानातील लाहोरमध्ये झालेल्या जाहीर सभेत करून खळबळ उडवून दिली. हाफिजच्या या वादग्रस्त विधानानंतर ट्विटर’ने ही कारवाई केली. दरम्यान, हाफिजच्या या वादग्रस्त विधानावर आशियातील राजकीय घडामोडीच्या जाणकार मायरा मॅकडोनाल्ड यांनी सुद्धा हाफिजच्या वक्तव्यावर टीका केली आहे. हाफिजच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या मानसिकतेत काही बदल झाला नसल्याकडे मायरा यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे.

Leave a Comment