मुंबईत पुन्हा दम मारो दम; सर्वोच्च न्यायालयाने उठवली बंदी

hukka
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबई महानगर पलिकेने हुक्का पार्लरवर घातलेली बंदी उठवल्यामूळे मुंबईतील हुक्का पार्लर आता अधिकृतपणे सुरू होणार आहेत. आता ३१ डिसेंबरच्या आनंदात आता हुक्क्याचीही भर पडणार आहे.

न्यायालयाने हुक्का पार्लरवरील बंदी मुंबईत ज्या ठिकाणी स्मोकिंग झोन आहेत त्या ठिकाणी हुक्का पार्लर चालवायला काय अडचण आहे असे सांगत उठविली आहे. मुंबई महापालिकेने तीन वर्षापूर्वी ‘हुक्का पार्लरच्या माध्यमातून तरूणांना व्यसनाधीन बनविण्याचे प्रकार आढळून आल्याने हुक्का पार्लरवर बंदी आणली होती. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठविली आहे.

मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांत हुक्का पार्लरवर बंदी असतानाही हुक्का पार्लर सुरू असल्याचे निष्पन्न होत होते. बंदी असतानाही ते चालूच राहायचे. सरकार व प्रशासनाच्या पातळीवर दुर्लक्ष होत असल्याने हुक्का पार्लर राजरोसपणे सुरू होते. मुंबईतील काही व्यावसायिक हुक्का पार्लर बंद करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हुक्का पार्लर व्यावसायिकांच्या बाजूने निकाल दिला आहे.

Leave a Comment