मुंबई – न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ताब्यात असलेल्या आरिफ माजिदच्या पोलिस कोठडीत १४ दिवसांची वाढ केली असून आता २२ डिसेंबरपर्यंत आरिफला तुरूंगात राहावे लागणार आहे. काही महिन्यापूर्वी कल्याणमध्ये राहणारे आरिफ माजिद, फरहान शेख, साहिम तंकी आणि अमान तांडेल हे चार तरूण इसिस या दहशतवादी संघटनेकडून लढण्यासाठी इराकला गेल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी आरिफ हा भारतात परतला आहे.
२२ डिसेंबरपर्यंत आरिफ माजिदच्या कोठडीत वाढ
इराकमधील हवाई हल्ल्यात आरिफचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. मात्र आरिफने वडिलांना फोन करून आपण तुर्कीत असल्याचे सांगितले होते. एनआयचे विशेष पथक २८ नोव्हेंबरला आरिफला तुर्कीहून मुंबईला घेऊन आले.
आरिफ हा सिव्हील इंजिनिअर असून २४ मेला दुपारी १२ ते १ च्या दरम्यान स्थानिक मशिदीत नमाज अदा करण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडला होता. तेव्हापासून तो गायब होता.