
मुंबई : मुंबईसह देशातील चार मुख्य शहरांमध्ये केंद्र सरकारने हाय अलर्ट घोषित केला आहे.
मुंबईसह ४ प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट
दहशतवादी दिल्ली, बंगळूरू, हैदराबाद आणि मुंबई या शहरांना आपले लक्ष्य बनवू शकतात, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. या शहरांमधील शाळा, कॉलेज, मॉल, गर्दीचे आणि धार्मिक स्थळांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.
काश्मीरवर तोडगा न काढल्यास भारताविरोधी जिहाद पुकारू, अशी धमकी मुंबई हल्ल्यातील सूत्रधार हाफिज सईदने शुक्रवारी लाहोरमधील सभेत दिली. या धमकीनंतर सर्वत्र हाय अलर्ट घोषित करण्यात आले आहे.
