पहिल्या कसोटीत क्लार्क खेळण्याची शक्यता

clark
ऍडलेड – ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क वेळेत तंदुरुस्त होऊन पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता उंचावली आहे. क्लार्कने ऍडलेड ओव्हलवर संघाच्या सरावात सहभाग घेतला. उपकर्णधार ब्रॅड हॅडिननेदेखील क्लार्क भारताविरुद्ध मंगळवारपासून पहिल्या कसोटीत खेळेल असा विश्वास व्यक्त केला. ‘क्लार्कचा सराव पाहता तो पहिल्या कसोटीत खेळेल असे वाटते. क्लार्क पहिल्या कसोटीत खेळावा ही प्रत्येक संघसहकार्‍याची इच्छा आहे,’ असे हॅडिनने म्हटले. क्लार्कचा संघात समावेश असला तरी त्याचे खेळणे तंदुरुस्तीवर अवलंबून आहे. आता क्लार्क जर खेळला नाही तर हॅडिन संघाचे नेतृत्व करेल. मात्र क्लार्कने शुक्रवारीदेखील संघाच्या सरावात सहभाग घेतला होता. क्रिकेटपटू फिलिप ह्युजच्या निधनामुळे पहिली कसोटी पुढे ढकलण्यात आली होती. इतकेच नाही तर ऑस्ट्रेलियाने देखील पहिल्या कसोटीच्या सरावाला शुक्रवारपासून सुरुवात केली होती. ‘पुन्हा क्रिकेटकडे परतलो. क्रिकेट या खेळावर आम्हा सर्वाचेच प्रेम आहे. आता कसोटी मालिकेची जोमाने तयारी करायची आहे,’ असे हॅडिनने म्हटले.

Leave a Comment