हवामानामुळे दुसर्‍यांदा लांबणीवर ‘जी-सॅट’चे प्रक्षेपण

isro
बंगळुरू – वाईट हवामानाचा फटका पुन्हा एकदा भारताच्या अत्याधुनिक दूरसंचार उपग्रह ‘जी-सॅट’ला बसला. शनिवारी पहाटेच्या सुमारास हा उपग्रह अंतराळात झेपावणार होता. परंतु, वाईट हवामानामुळे त्याचे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले. आता उद्या रविवारी या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाऊ शकते.

सलग दुसर्‍यांदा वाईट हवामानाचा फटका ‘जी-सॅट’ला बसला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजून नऊ मिनिटांनी हा उपग्रह अंतराळात झेपावणार होता. पण, तयारी सुरू असतानाच इस्रोने त्याचे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्याची घोषणा केली. फ्रेंच गयाना येथील कौरोवूच्या अंतराळ केंद्रातून ‘एरियाना-५’ या रॉकेटच्या मदतीने या उपग्रहाचे प्रक्षेपण उद्या रविवारी केले जाऊ शकते, अशी माहिती इस्रोच्या अधिकार्‍याने दिली.

Leave a Comment