सहारा समूहाने जमीन विक्रीतून उभारले १२११ कोटी

sahara
नवी दिल्ली – गुरगावजवळील चौमा गावातील ही जमीन सहारा समूहाने स्थावर मालमत्ता कंपनी एम३एम इंडियाला विकली असून या व्यवहारातून कंपनीने १२११ कोटी रुपये उभारले. समूहाचे सर्वेसर्वा सुब्रता रॉय यांना तिहार तरुंगातून बाहेर काढण्यासाठी यामुळे मोठा हातभार लागणार आहे.

कंपनीने आणखी दोन ठिकाणच्या जमिनीची विक्री करणार असल्याचे म्हटले असून यामध्ये वसई आणि जोधपूर येथील जमिनीचा समावेश असून यातून १२५० कोटी रुपये मिळतील असा कंपनीला विश्वास असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या व्यवहारांची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

गुरगावमधील हा जमीन व्यवहार २०१४मधील सर्वात मोठा व्यवहार असून १८५ एकर असलेली ही जमीन विविध कारणांसाठी विकसित करण्यात येणार असून येत्या सात-आठ वर्षामध्ये यातून १२,००० कोटी रुपयांची महसुली क्षमता आहे. मात्र सहारासाठी हा घाटयातला व्यवहार नसल्याचे एम३एम इंडियाचे संचालक पंकज बंसल यांनी स्पष्ट केले. सहा महिन्यांमध्ये ही किंमत अदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment