राज्यभरातील सरकारी बँका ठप्प

sbi
मुंबई : सरकारी बँकेतील कर्मचारी आज संपावर गेल्यामुळे बँकेचे कोणतेही व्यवहार करणे आज शक्य होणार नाही. बँक कर्मचाऱ्यांनी हा संप पगारवाढ, पाच दिवसांचा आठवडा, कामाचे कमी तास आणि अधिक संख्याबळ या मागण्यांसाठी पुकारला आहे.

सुमारे दहा लाख कर्मचाऱ्यांचा या संपात सहभाग आहे. २ ते ५ डिसेंबर या तीन दिवसामध्ये हा संप देशभरात टप्प्या टप्प्य़ाने केला जात आहे. दक्षिण भारतात २ तारखेला संप पुकारण्यात आला होता. उत्तर भारतात ३ तारखेला संप होता.

तर महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दीव-दमणमध्ये आज ५ तारखेला संप पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज बँक कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात मोर्चाचे आयोजन केले आहे.

Leave a Comment