नवीन वर्षात ‘दरवाढीचा शॉक’

electricity
मुंबई : महागाईने होरपळलेल्या राज्यातील जनतेवर आता वीज दरवाढीचे संकट कोसळणार असून नवीन वर्षापासून म्हणजेच जानेवारीपासून २५ ते ३० टक्के वीज ग्राहकांवर दरवाढ लादण्यात येणार आहे.

वीज मंडळाला दर महिन्याला देण्यात येणारे ७०० कोटींचे अनुदान रद्द करण्याचा निर्णय राज्यात स्थापन झालेल्या फडणवीस सरकारने घेतला असल्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी हा बोजा ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय वीज मंडळाने घेतला आहे. परिणामी राज्यातील ‘एमईआरसी’ अंतर्गत येणा-या सर्व वीज पुरवठा कंपन्यांच्या वीज देयकात घसघशीत वाढ करण्यात येणार असून मात्र, यामधून मुंबईला वगळण्यात आले आहे. येत्या जानेवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. दरम्यान, शेती पंपाच्या वीज बिलाला ही दरवाढ लागू नसेल, असे ‘एमईआरसी’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Leave a Comment