दुस-या सराव सामन्यात टीम इंडियाचा दबदबा

team-india
अॅडलेड – भारत आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) इलेव्हन यांच्यामध्ये झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात टीम इंडियाने आपला दबदबा कायम ठेवला. पहिल्या डावात ३७५ धावा करणाऱ्या भारतीय संघाने क्रिकेट ऑस्ट्रेलियावर १३२ धावांची आघाडी घेतली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २४३ धावा केल्या होत्या.

भारताकडून मुरली विजय (६०), विराट कोहली (६६), अजिंक्य रहाणे (५६), वृध्दीमान सहा (५१) यांनी अर्धशतके झळकवली. रोहित शर्मा (४८) धावांवर धावचीत झाला. विजय, कोहली आणि रहाणे यांनी अर्धशतकांनंतर अन्य फलंदाजांना संधी मिळावी यासाठी स्वत:हून मैदान सोडले. दुस-या डावातही भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. जेसी सिल्कचा अपवाद वगळता अन्य फलंदाज चमक दाखवू शकले नाहीत. सिल्क (४१) धावांवर नाबाद राहिला.

दुस-या डावात इशांत शर्माने दोन, उमेश यादव, वरुण अॅरॉन आणि करण शर्माने प्रत्येकी एक गडी बाद केला. सामना संपला तेव्हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या धावफलकावर पाच बाद ८३ धावा होत्या. या कामगिरीवरुन भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या पहिल्या कसोटीसाठी सज्ज असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment