चीनी लष्कराच्या आधुनिकीकरणास गती देणार- शी जिनपिंग

china
नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठे लष्कर अशी प्रसिद्धी असलेल्या चीनी लष्कराच्या आधुनिकीकरणाचा वेग वाढविण्यात येणार असल्याचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रपतीपदाबरोबर चीनच्या लष्कराचे प्रमुख असलेल्या जिनपिंग यांनी ही घोषणा पिपल्स लिबरेशन आर्मीच्या संमेलनात बोलताना केली.

जिंनपिंग म्हणाले की राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्कराला नवसंजीवनी देण्यासाठी लष्करी हत्यारे, तंत्रे यांचे आधुनिकीकरण करणे अत्यंत गरजेचे असते. आधुनिकीकरण करतानाही लष्कराच्या गरजा आणि हत्यारांची गुणवत्ता सांभाळणे फार महत्त्वाचे आहे आणि या कामासाठी गती देण्यात येत आहे. चीनच्या लष्करात 23 कोटी सैनिक असून ते जगातील सर्वात मोठे लष्कर आहे. त्यांचे गतवर्षीसाठीचे बजेट 132 अब्ज र्डालर्स इतके होते. गरज ‘असले तर त्यात वाढ करण्यात येईल असेही जिनपिंग यांनी सांगितले.

अमेरिकेचे लष्करासाठीचे बजेट जगात सर्वाधिक असून ते 700 अब्ज र्डालर्स इतके आहे. त्यानंतर चीनचा दुसरा नंबर आहे. चीनच्या लष्करी आधुनिकीकरणाची सुरवात यापूर्वीच झाली असून त्यात प्रामु‘याने दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे, विमानवाहू नौका, लढाऊ नौका, बॉम्बफेकी विमाने आणि सायबर युद्ध यांच्या आधुनिकीकरणावर भर दिला जात आहे. त्यात हत्यारांसोबतच तंत्रज्ञान विकसित करण्यावरही जोर दिला जात असल्याचे समजते.

Leave a Comment