आज होणार युती शासनाचा मंत्रिमंडळ विस्तार

yuti
मुंबई : भाजपा-शिवसेनेचे सुत पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत झालेल्या मनमुटावानंतर अखेर जुळले. युती झाल्याची घोषणा झाल्यानंतर आज (शुक्रवार) दुपारी ४ वाजता विधानभवनाच्या प्रांगणात युती शासनाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

शिवसेना आणि भाजपाच्या प्रत्येकी १० मंत्र्यांना या समारंभात शपथ देण्यात येणार असून मंत्र्यांच्या संभाव्य यादीत शिवसेनेच्या वतीने कॅबिनेटसाठी ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (उद्योग), एकनाथ शिंदे (उर्जा), रामदास कदम (पर्यावरण), डॉ. दिवाकर रावते (परिवहन), दीपक सावंत (आरोग्य) तर भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, गिरीश बापट, बबन लोणीकर, राजकुमार बडोले हे मंत्रिपदाची शपथ घेतील.

राज्यमंत्रिपदासाठी शिवसेनेकडून विजय शिवतारे, दीपक केसरकर, रविंद्र वायकर, संजय राठोड आणि दादा भूसे, तर भाजपकडून विजय देशमुख, राम शिंदे, प्रविण पोटे, राजे अमरिश महाराज आणि रणजित पाटील हे शपथ घेणार आहेत.

Leave a Comment