अखेर छत्रपतींच्या स्मारकाला पर्यावरण विभागाकडून हिरवा कंदिल

shivaji
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात उभारल्या जाणा-या स्मारकासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाकडून अखेर मंजुरी दिली गेली असून त्यासंबंधीचे आदेश आज म्हणजे शुक्रवारी महाराष्ट्र शासनाकडे पोहोचतील असे केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. अरबी समुद्रात उभारण्यात येणार्या या स्मारकासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद पूर्वीच्या सरकारने केली होती.

गेली कांही वर्षे छत्रपतींच्या स्मारकाचा प्रश्न लोंबकाळत पडला होता. काँग‘ेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने 2004 साली अरबी समुद्रात छत्रपतींचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती मात्र त्याला पर्यावरण विभागाकडून मंजुरी दिली गेली नव्हती. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यानंतर राज्याचे मु‘यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा केली आणि त्यांनरत ही परवानगी दिली गेली असे सांगितले जात आहे.

अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा अथवा कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाप्रमाणेच छत्रपतींचे स्मारकही समुद्रात उभारले जाणार आहे. त्यासाठी महाराजांचा 309 फूट उंचीची अश्वारूढ पुतळा तयार करण्यात येणार आहे. हे स्मारक मरीन ड्राईव्हजवळ समुद्रात उभारण्याचा सरकारचा मानस होता मात्र त्याला नौदलाने विरोध केल्यानंतर अन्य जागी समुद्रातच हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता असेही समजते.

Leave a Comment